दिवाळी हा आहे वर्षाचा सगळ्यात मोठा सण उत्साह, आनंद देणारा आणि त्यात येणारे लक्ष्मीपूजन... दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने काही अत्यंत प्रभावी लक्ष्मी प्राप्तीचे सहज सोपे उपाय..... नक्की वाचा
श्री लक्ष्मी माता म्हणजे वैभव, ऐश्वर्य, सुख ,शांती, समाधान ,आनंद ,प्रेम ,सर्व सुख देणारी माता... आणि हेच आपल्या आयुष्यातला वास्तव... क्षीरसमुद्र कन्या व श्री विष्णूंची पत्नी श्री लक्ष्मी माता समुद्रमंथनातून प्रकट झाली आहे त्यामुळे पाणी आणि लक्ष्मी माता यांचा विशेष संबंध आहे. हेच पाणी लक्ष्मी प्राप्तीसाठी कसे उपयुक्त ठरते ते आता आपण पाहू..
१. सर्वप्रथम घरातील गळके नळ बंद करावे.-
जर घरात नळ गळत असतील त्यामुळे लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होत नाही थोडक्यात लहान लहान खर्चातून पैसा वाया जातो त्यामुळे घरातील गळके नळ त्वरित ठीक करून घ्यावेत.
२.साठवणीचे पाणी गरजेपुरते साठवावे.-
जास्तीचं पाणी आपण बऱ्याच वेळा वाया घालवतो ओतून देतो असं केल्याने अचानक धनाचा व्यय होतो त्यासाठी जास्तीचं पाणी घरच्या गरजांना वापरावे जसे कपडे धुण्यासाठी ,भांडी घासण्यासाठी, झाडांसाठी ज्यामुळे अचानक उद्भवणारे खर्च थांबतील.
त्याचबरोबर पाण्याचा साठा जसे माठ, पाण्याचे पिंप, हंडा ,कळशी इत्यादी च्या बाजूला दिवा लावावा ज्यामुळे ते पाणी आरोग्यदायी होते.
३. पाणी भरताना "ओम नमो भगवते वासुदेवाय नमः" हा मंत्र म्हणावा.-
जिथे श्री विष्णू वासुदेव तिथे लक्ष्मी मातेचा वास असतो त्यामुळे असे केल्याने आपणास लक्ष्मी मातेची कृपा लाभते.
४. आपण जेव्हा पाणी पिण्यासाठी घेतो त्यावेळेस पाणी पूर्ण प्यावे अर्धे ठेवू नये.-
ग्लास, बाटली, तांब्या कशातूनही पाणी पिताना ते पाणी पूर्णपणे आपण पिऊ घ्याची खबरदारी घ्यावी. किंवा जितके पाणी पिऊ शकतो तितकेच पाणी भांड्यात घेऊन प्यावे.
तसेच पाणी पिण्या पूर्वी दोन सेकंद थांबून त्या पाण्याला तुम्हाला हव्या असलेल्या इच्छा व्यक्त कराव्या.- त्यानंतर पाणी प्यावे त्यामुळे तुमच्या शरीराची, मनाची सकारात्मकता वाढेल.
५. लक्ष्मी पूजनाच्या दिवसा पासून अखंड दीप तेवत ठेवावा –
तो दीप 24 तास व 365 दिवस चालू राहिला अशी योजना करावी. ( जर काही कारणा मुळे जर ज्योत शांत झाली ( विझली असे म्हणू नये म्हणून शांत झाली असे म्हणतात) तर अगदी निश्चिंत मनाने लमी मातेचा जप करीत ती पुन्हा तेववावी ( पेटवावी म्हणू नये).
अशाप्रकारे पूजा विधी व पाण्याची योग्य काळजी घेतल्याने आणि योग्य वापराने लक्ष्मी मातेची आपल्यावर अखंड कृपा राहील आणि आणि आपल्या आयुष्यात आर्थिक सुबत्ता, सुख समाधान येईल.....
|| शुभं भवतु ||
No comments:
Post a Comment