Friday, September 25, 2020

Financial literacy - भारतातील अर्थसाक्षरता

भारतातील अर्थसाक्षरता

एका आंतरराष्ट्रीय संस्थेंने भारतात किती अर्थसाक्षरता किती आहे यावर एक सर्वे केला. खालील निष्कर्ष अतिशय धक्कादायक आहेत.

-६७% भारतीय हे इंशुरन्सला (विम्याला) गुंतवणुक समजतात – ह्याचे कारण आपली गुंतवणूकीबद्दल असणारी अनभिज्ञता व गावोगावी असणारे विमा प्रतिनिधी, ज्याना भरघोस कमिशन मिळते. जे आपल्या आर्थिक कल्याणाचा आव आणून गुंतवणुकीसाठी विमा सुचवतात व आपला पिछ्छा पुरवतात. व एकदा पॉलिसी घेतली की शक्यतो लांब राहतात.

-   सोने हा गुंतवणुकीचा नाही तर हेंजिगचा असेट क्लास आहे हे ९३% भारतीयांना माहीतच नाही.

-  रिटर्न्स (गुंतवणूकीवरील परतावा) हे महागाईवर मात करणारे हवेत म्हणजे नेमके कायहे सांगणारे फक्त २% भारतीय निघाले.

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुक करणारे २२% भारतीय SIP हे एका योजनेच नाव आहे असे समजतात.

-  असेट अलोकेशन(संपत्तीचे विकेन्द्रीकरण) म्हणजे काय हे ८८% भारतीयांना ठाऊक नाही.

-  ६३% लोक हे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुक केल्यावर म्युच्युअल फंडाची पॉलीसी घेतली असे म्हणतात. ते म्युच्युअल फंड्ड म्हणजे इंशुरंन्स मधीलच एक पॉलीसीसारखा प्रकार आहे अस समजतात.

-  टॅक्स फ्री हा बॉण्ड ८० प्रमाणे सवलत देतो अस मानणारे ७६% भारतीय आढळुन आले.

-  ९२% लोक हे निवृत्तीजीवन आपल्या मुलांच्या भरवशावर सोङतात. जे ८% लोक निवृत्ती जीवनासाठी तरतुद करतात त्यातील ६१% लोकांनी निवृत्तीसाठी इंशुरंन्स पॉलीसीची निवङ केली आहे ज्यात परतावा ५% पेक्षाही कमी असतो- ह्याचे मुख्य कारण विमा कंपन्याचे सावज शोधणारे एजंट.

-  संपुर्ण फायनान्शियल प्लॅनिंग करणाऱ्या व्यक्तीची संख्या ०.०४२% इतकी कमी आढळुन आली.

-  भारतात फक्त ५% लोक आरोग्य विमा घेतात. जपान मध्ये ९२% लोकांकङे आरोग्य विमा असुन तेथिल हॉस्पीटल्स मध्ये हा विमा नसेल तर उपचारच करता येत नाही. इतर प्रगतराष्ट्रात हेच प्रमाण ७९% आहे.

-  भारतात साधारण विमा (जनरल इन्शुरन्स) घेणाऱ्यांची संख्या ३६% असुन त्यात मुदतीचा विमा (टर्म प्लॅन) घेणारे केवळ ७% लोक आढळुन आले.

-  एलआयसी ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असुन ती ८५ लाख करोङ इतक्या मोठ्या निधीचे व्यवस्थापन पाहते. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष २४ लाख लोकांना एलआयसी कडून रोजगार मिळतो (ह्यात विमा एजंटांचा समावेश आहे).

-  आपल्या गुंतवणुकदारांना ४ ते ५% परतावा (सी.ए.जी.आर.) देणारी एलआयसी ही भारतातील शेअरबाजारात गुंतवणुक करणारी सर्वात मोठी संस्थागत गुंतवणुकदार आहे .

-  पोस्टल लाईफ घेणाऱ्यांची संख्या त्या खालोखाल आहे. तिचा परतावा जवळपास ६% इतका आहे.

-  भारतातील म्युच्युअल फंड इंडस्ट्री ही चागंली पारदर्शक असुन व सेबी ही उत्तम नियंत्रक असली तरी भारतातील फक्त 5 ते 8% लोकच यात गुंतवणुक करतात. म्युच्युअल फंड वितरकांचा प्रचंड अभाव व मिळणारे नगण्य कमिशन याचे प्रमुख कारण असुन त्यांची संख्या संपुर्ण भारतभरात फक्त अंदाजे दीड लाख इतकीच आहे. त्यातील फक्त 25% प्रत्यक्ष काम करताना आढळतात. त्यांची वाढ व्हावी यासाठी बाजाराची नियंत्रक सेबी कुठलही पाऊल उचलत नाही. शिवाय त्यांना मोकळेपणाने काम करण्याच स्वातंत्र नाही. म्युचअल फंङ मध्ये एकुण गुंतवणुक वाढत आहे.

-  ५४ ईसी बॉण्डइंफ्रा बॉण्डपीएमएसकार्पोरेट एफडी इ. फायनान्शियल प्रॉडक्टबद्दल फक्त ९% भारतीयांना माहिती आहेत.

-   भारतीय शेअरबाजार हा जगातील जुन्या शेअरबाजारा पैकी एक असुनही फक्त 6% लोकच शेअरबाजारात गुंतवणुक करतात. गेल्या 40 वर्षात तब्बल १५.६८% इतका परतावा सातत्याने देवुनही बहुतांश भारतीय लोक याला सट्टा किंवा जुगार मानतात. भारतातील लोकांपेक्षा परदेशी गुंतवणुकदार येथे जास्त प्रमाणात गुंतवणुक करताना आढळतात. शेअरबाजारात गुंतवणुक ही संस्कृती रुजवण्यात सरकार व नियंत्रक सेबी अपयशी ठरले आहेत अस मत आहे.

*आर्थिक साक्षर व्हा*

माहिती व मार्गदर्शन 

व्हॉटसअप

गुंतवणूक व असेट अलोकेशन एकत्रित प्लॅटफॉर्म साठी लिंक  :

Empathee Solutions

Monday, September 21, 2020

म्युचुअल फंडाचा फंडा ... १

म्युच्युअल फंड म्हणजे काय?

म्युच्युअल फंड बद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल कि अनेक लोकाना शेअर बाजारात गुंतवणूक करावीशी वाटते. त्यांचेकडे पैसेही असतात मात्र त्यांना शेअर बाजाराचे ज्ञान पुरेशा प्रमाणात नसते.

अशांसाठी आपल्या देशात प्रथमतः सरकारच्या सहभागाने युनिट ट्रस्ट इंडिया या असेट मॅनेजमेंट कंपनीची (AMC) स्थापना सन १९६४ मधे करण्यात आली. 

आपल्यापैकी पुष्कळ 50+ वयाच्या गुंतवणूकदारांनी मास्टर शेअर, मास्टर प्लस बाबत ऐकले असेल. युनिट ट्रस्ट (Unit Trust of India). हीच ती भारतातील पहिली म्युच्युअल फंड कंपनी. 
१९८६ मधे सर्वजनीक बॅंकाना म्युच्युअल फंड स्थापण्याची परवानगी देण्यात आली. 
१९९३ पासून खाजगी म्युच्युअल फंडाना परवानगी मिळाली. सध्या देशात 44 हून जास्त म्युच्युअल फंड कंपन्या कार्यरत आहेत. 

पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणुक करता तेव्हा तुम्ही एकटे नसता. आपले पैसे बँकांतील ठेवी पेक्षा जास्त दराने कायदेशीर रित्या वाढावेत आणि ते तज्ञानी आपल्या वतीने करुन द्यावे असा तुमच्यासारखा विचार करणारे इतर अनेक गुंतवणूकदार तुमच्या सोबत असतात. 

तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणुक केली की तुमच्यासारखेच  ध्येय असणा-या गुंतवणूकदारांचे पैशासोबत तुमचे पैसे एकत्र केले जातात. तुम्ही केलेल्या गुंतवणूकीच्या बदल्यात तुम्हाला युनिटस दिली जातात. 

(तुम्ही केलेली गुंतवणूक रुपये / त्या दिवशीचे गुंतवणूक मुल्य म्हणजेच NAV = तुम्हाला अदा केलेली युनिटस्) 

मग हे पैसे म्युच्युअल फंड कंपनीचा फंड मॅनेजर शेअर्स। डिबेंचर्स ते मनी मार्केट पर्यंतच्या वेगवेगळ्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवतात. त्याला कॉर्पस (corpus) या नावानेही ओळखले जाते. रोजच्या रोज सायंकाळी गुंतवणूकीचे मुल्यांकन केले जाते आणि प्रत्येक युनिटचे निव्वळ मालमत्ता मुल्य Net Asset Value (NAV) जाहीर केली जाते. अशाप्रकारे म्युच्युअल फंड तुम्हाला तुलनात्मकदॄष्ट्या कमी खर्चात विविध व्यावसायिक व्यवस्थापन (Professionally Manage) केलेल्या फंड्मध्ये गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करुन देतो

अशाच माहिती साठी फेसबुक पेज ला भेट द्या 
अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी. 
WhatsApp - 9130993995