Saturday, December 5, 2020
Welcome.. 2021... It's time to plan finances.
Thursday, December 3, 2020
वेळ आर्थिक नियोजनाची...
नवीन वर्षाचे स्वागत करण्यापूर्वी, आपल्या गेल्या वर्षाच्या आर्थिक नियोजनाचे मूल्यांकन करण्यासाठी थोडा वेळ द्या.
हे फार मोठं काम नाही. आपलं भविष्य घडवायचं असेल, तर आपला वर्तमान समजून घेणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्या नवीन आर्थिक नियोजनासाठी आपली चालू आर्थिक स्थिती व त्याचे मुल्याकंन करणे आवश्यक आहे.
आपली आर्थिक स्थिती जाणून घ्यायची सर्वात योग्य वेळ म्हणजे वर्षअखेर!
चालू वर्षाचा अखेरचा आठवडा संपण्यापूर्वी आपली आर्थिक स्थिती समजून घेऊन नव्या वर्षाचे आर्थिक नियोजन तयार करा.
आर्थिक उद्दिष्टांविषयी –
आपल्या आर्थिक नियोजनाचा आढावा घेताना स्वतःलाच काही महत्वाचे प्रश्न विचारा-
तुम्ही तुमची आर्थिक उद्दीष्टे साध्य करण्यात यशस्वी झाला आहात का?
तुमची काही उद्दिष्टे दीर्घकालीन असतील, तर ती संपूर्णपणे साध्य करण्यासाठी थोडा वेळ लागेल. परंतु, त्यासाठीच्या स्टेप्स व अल्प-मुदतीची निश्चित केलेली आर्थिक उद्दिष्ट्ये यशस्वी झाली आहेत का?
क्रेडिट कार्डची थकबाकी वेळेवर भरली आहे का?
नवीन कर्जे घेतली आहेत का?
आपला गुंतवणूक पोर्टफोलिओ रिव्ह्यू केला आहे का?
टाळता येण्यासारखे काही अनावश्यक खर्च केलं आहेत का?
आर्थिक नियोजनाचे सुवर्ण नियम
या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतर आपले आर्थिक नियोजन यशस्वी झाले आहे का? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही शोधू शकाल. जर या प्रश्नाचे उत्तर हो असेल, तर तुमचे अभिनंदन! तुम्ही तुमचे पुढील वर्षाचे आर्थिक नियोजन दुप्पट उत्साहाने करू शकता.
जर उत्तर नाही असेल, तर निराश होऊ नका. अयशस्वी कारणे शोधून त्यावर उपाय शोधा. जेणेकरून पुढील आर्थिक नियोजन करताना या सर्व चुका विचारात घेऊन तुम्ही तुमचे आर्थिक नियोजन तयार करु शकाल.
जर तुमचे आधीच्या वर्षीचे आर्थिक नियोजन अयशस्वी झाले असेल तर, नवीन आर्थिक नियोजन करताना त्याचे चार भाग करा-
-मासिक
-त्रैमासिक
-सहा महिने
-वार्षिक
यामुळे नियोजन करतना तुमचा गोंधळ होणार नाही. तसेच प्रत्येक भागाचं आर्थिक नियोजन यशस्वी होतंय का, हे त्या भागाच्या शेवटी तपासून ते यशस्वी होत नसेल तर, त्याची कारणे वेळीच शोधता येतील व त्यावर उपायही करता येतील.
पुढील आर्थिक नियोजन करताना खालील मुद्दे विचारात घ्या-
१. कर्जबाजारीपणाची लक्षणं
कर्ज आणि कर्जफेड याचे नियोजन-
यामध्ये जी कर्ज आपल्या आर्थिक आरोग्यास हानिकारक असतील त्यांचे समूळ उच्चाटन करा, म्हणजेच शक्य तितक्या लवकर त्याची परतफेड करा.
आपल्या कुटुंबातील सदस्स्याकडून किंवा जवळच्या मित्रांकडून कर्ज घेतले असेल, तर ते सर्वात आधी परत करा.
२. काटकसर म्हणजे काय?
काटकसर म्हणजे कंजूसपणा नव्हे.
तुमच्या कमाईवर तुमचा पूर्ण अधिकार आहे. आर्थिक नियोजन करताना पै पै चा हिशोब फक्त बचत आणि गुंतवणुकीसाठी करू नका.
आयुष्यात अनेक छोटी छोटी स्वप्ने असतात, त्यांचाही विचार करा. आपल्या कमाईचा काही भाग या स्वप्नासाठी ‘राखीव’ ठेवा.
यामुळे तुमचे आर्थिक नियोजन तुम्हाला निरस वाटणार नाही आणि तुम्ही ते नाईलाज म्हणून नाही तर, मनापासून स्वीकाराल.
३. गुंतवणुकीची उद्दिष्टे व उत्साह
बचत व गुंतवणुकीसाठी पर्यायी उत्पन्न
आपल्या मोठ्या मोठ्या स्वप्नांची पूर्तता, कर्जफेड, गुंतवणूक इत्यादी गोष्टींसाठी आपल्या छोट्या छोट्या स्वप्नांचा बळी देण्यापेक्षा पर्यायी उत्पन्न शोधा.
बचत वाढविण्यासाठी खर्च कमी करताना उत्पन्न वाढविण्याचाही विचार करा.
४. गुंतवणूक नियोजन
दरवर्षी नवीन गुंतवणूक करणे अथवा अगोदरपासून असलेल्या गुंतवणुकीची मर्यादा वाढवणे या गोष्टी दीर्घकालीन फायदा मिळवून देतात. त्यामुळे नियोजन करताना गुंतवणुकीलाही तेवढंच महत्व देणे आवश्यक आहे.
आपल्या गुंतवणुका तपासून कमी परतावा देणाऱ्या योजना बंद करा व उत्तम परतावा मिळवून देणाऱ्या गुंतवणुकांना तुमच्या पोर्टफोलिओमध्ये स्थान द्या.
५. काय आहे बचतीचा आधुनिक फॉर्म्युला?
खर्चाच्या सवयी बदला-
अनेकदा आपल्या खर्चाच्या सवयी बदलूनही आपण बचत वाढवू शकतो. उदा. महागड्या हॉटेलमध्ये जेवण, महागडी जिम, ब्रँडेड कपडे, शूज, असेसरीज हे सारं खरंच आवश्यक आहे का? हा प्रश्न स्वतःला विचारल्यास त्याचं प्रामाणिक उत्तर ‘नाही’ हेच असेल. त्यामुळे शक्य असेल तिथे हे खर्च वाचवा.
ऑनलाईन खरेदी करताना अनेकदा ब्रँडेड वस्तू स्वस्तात मिळून जातात. त्यामुळे मॉलपेक्षा ऑनलाईन खरेदीचा पर्याय विचार घेता येईल. अर्थात ऑनलाईन व बाहेर मिळणाऱ्या वस्तूंच्या किमतीची तुलना करून मगच निर्णय घ्या.
सर्व बिलं वेळच्या वेळी भरल्यास लेट पेमेंट चार्जेस वाचू शकतात. त्यामुळे नियमितपणाचे महत्व ओळखून स्वतःला शिस्त लावा.
कर्ज, विमा, क्रेडिट कार्ड, इ. चे हप्ते, विमा नूतनीकरण यासारख्या महत्वाच्या गोष्टींच्या अंतिम तारखा लक्षात ठेवून त्यानुसार पेमेंट करा.
६. आर्थिक नियोजन आणि सक्षम कुटुंब
डिजिटल पेमेंट आणि वाढणारे खर्च:
आजकाल डिजिटल पेमेंटच्या विविध पर्यायांमुळे खिशात पैसे नसतानाही सहज खरेदी केली जाते. त्यामुळे खर्चांवर आळा घालणे कठीण होऊन बसलं आहे.
डिजिटल व्यवहारांचा लेखा जोगा ठेवणे, त्यांच्यासाठी स्वतःचे निश्चित नियम, खर्चाची मर्यादा तयार करणे आवश्यक आहे.
क्रेडिट कार्डची क्रेडिट मर्यादा वाढवून घेऊ नका. त्यामुळे पुन्हा खर्च वाढू शकतो.
इंटरेस्ट फ्री इएमआय, दुप्पट/तिप्पट कॅशबॅक यासारख्या ऑफर्सना भाळून उगाचच अनावश्यक किंवा महागडया वस्तूंची खरेदी करू नका.
आर्थिक नियोजन तयार केलं की आपलं काम संपलं असं करू नका. आपल्या आर्थिक नियोजनाचा प्रत्येक महिन्याला आपणच आढावा घ्यावा.
*आर्थिक साक्षर व्हा*
माहिती व मार्गदर्शन
गुंतवणूक व असेट अलोकेशन एकत्रित प्लॅटफॉर्म साठी लिंक :
E-wealth Account
Friday, November 13, 2020
२ मिनिटात वाचा.. समृद्ध आयुष्य व लक्ष्मी कृपेसाठी ५ उपाय....
Tuesday, October 6, 2020
Want to be Raided??.. Read How much GOLD you can HOLD
Most of the Indians are obsessed with gold. But are you aware of the restriction on how much gold can you hold even the worth of gold does not match your income status?
How much gold can be held without receipts?
What if govt starts raiding all households in India and demands the proof of how it is bought... want to know?
Often Indians do not keep a track of receipts and proof of how they paid for the gold which is bought long ago. In that case, how much gold can one hold without any proof, even if it does not match income status?
As per Central Board of Direct Taxes (CBDT), this limit is different for a married woman, unmarried women and a man. This might sound strange, but here is a limit..
| A Married woman | 500 gms |
| Unmarried woman | 250 gms |
| A Man | 100 gms |
These above limits include both the inherited and the self-bought gold jewelry. In case of inherited gold also, you need to have the receipts in the name of original owner.
In case you are holding very high amount of gold, just make sure that you have all the valid tax receipts and invoices saved at your end.
The WILL can also act as proof of inheritance, in case the gold you inherited is mentioned in the WILL. Alternatively, one can also submit a family settlement deed, will, or a gift deed stating the transfer of such commodity to you.
On contrary, if there is no such document available, then the officer will analyze your family’s social status, customs, and traditions to come to a conclusion on whether your statement is valid or not and whether to confiscate the amount of gold you are holding or not.
Friday, September 25, 2020
Financial literacy - भारतातील अर्थसाक्षरता
भारतातील अर्थसाक्षरता
एका आंतरराष्ट्रीय संस्थेंने भारतात किती अर्थसाक्षरता किती आहे यावर एक सर्वे केला. खालील निष्कर्ष अतिशय धक्कादायक आहेत.
-६७% भारतीय हे इंशुरन्सला (विम्याला) गुंतवणुक समजतात – ह्याचे कारण आपली गुंतवणूकीबद्दल असणारी अनभिज्ञता व गावोगावी असणारे विमा प्रतिनिधी, ज्याना भरघोस कमिशन मिळते. जे आपल्या आर्थिक कल्याणाचा आव आणून गुंतवणुकीसाठी विमा सुचवतात व आपला पिछ्छा पुरवतात. व एकदा पॉलिसी घेतली की शक्यतो लांब राहतात.
- सोने हा गुंतवणुकीचा नाही तर हेंजिगचा असेट क्लास आहे हे ९३% भारतीयांना माहीतच नाही.
- रिटर्न्स (गुंतवणूकीवरील परतावा) हे महागाईवर मात करणारे हवेत म्हणजे नेमके काय? हे सांगणारे फक्त २% भारतीय निघाले.
- म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुक करणारे २२% भारतीय SIP हे एका योजनेच नाव आहे असे समजतात.
- असेट अलोकेशन(संपत्तीचे विकेन्द्रीकरण) म्हणजे काय हे ८८% भारतीयांना ठाऊक नाही.
- ६३% लोक हे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुक केल्यावर म्युच्युअल फंडाची पॉलीसी घेतली असे म्हणतात. ते म्युच्युअल फंड्ड म्हणजे इंशुरंन्स मधीलच एक पॉलीसीसारखा प्रकार आहे अस समजतात.
- टॅक्स फ्री हा बॉण्ड ८० C प्रमाणे सवलत देतो अस मानणारे ७६% भारतीय आढळुन आले.
- ९२% लोक हे निवृत्तीजीवन आपल्या मुलांच्या भरवशावर सोङतात. जे ८% लोक निवृत्ती जीवनासाठी तरतुद करतात त्यातील ६१% लोकांनी निवृत्तीसाठी इंशुरंन्स पॉलीसीची निवङ केली आहे ज्यात परतावा ५% पेक्षाही कमी असतो- ह्याचे मुख्य कारण विमा कंपन्याचे सावज शोधणारे एजंट.
- संपुर्ण फायनान्शियल प्लॅनिंग करणाऱ्या व्यक्तीची संख्या ०.०४२% इतकी कमी आढळुन आली.
- भारतात फक्त ५% लोक आरोग्य विमा घेतात. जपान मध्ये ९२% लोकांकङे आरोग्य विमा असुन तेथिल हॉस्पीटल्स मध्ये हा विमा नसेल तर उपचारच करता येत नाही. इतर प्रगतराष्ट्रात हेच प्रमाण ७९% आहे.
- भारतात साधारण विमा (जनरल इन्शुरन्स) घेणाऱ्यांची संख्या ३६% असुन त्यात मुदतीचा विमा (टर्म प्लॅन) घेणारे केवळ ७% लोक आढळुन आले.
- एलआयसी ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असुन ती ८५ लाख करोङ इतक्या मोठ्या निधीचे व्यवस्थापन पाहते. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष २४ लाख लोकांना एलआयसी कडून रोजगार मिळतो (ह्यात विमा एजंटांचा समावेश आहे).
- आपल्या गुंतवणुकदारांना ४ ते ५% परतावा (सी.ए.जी.आर.) देणारी एलआयसी ही भारतातील शेअरबाजारात गुंतवणुक करणारी सर्वात मोठी संस्थागत गुंतवणुकदार आहे .
- पोस्टल लाईफ घेणाऱ्यांची संख्या त्या खालोखाल आहे. तिचा परतावा जवळपास ६% इतका आहे.
- भारतातील म्युच्युअल फंड इंडस्ट्री ही चागंली पारदर्शक असुन व सेबी ही उत्तम नियंत्रक असली तरी भारतातील फक्त 5 ते 8% लोकच यात गुंतवणुक करतात. म्युच्युअल फंड वितरकांचा प्रचंड अभाव व मिळणारे नगण्य कमिशन याचे प्रमुख कारण असुन त्यांची संख्या संपुर्ण भारतभरात फक्त अंदाजे दीड लाख इतकीच आहे. त्यातील फक्त 25% प्रत्यक्ष काम करताना आढळतात. त्यांची वाढ व्हावी यासाठी बाजाराची नियंत्रक सेबी कुठलही पाऊल उचलत नाही. शिवाय त्यांना मोकळेपणाने काम करण्याच स्वातंत्र नाही. म्युचअल फंङ मध्ये एकुण गुंतवणुक वाढत आहे.
- ५४ ईसी बॉण्ड, इंफ्रा बॉण्ड, पीएमएस, कार्पोरेट एफडी इ. फायनान्शियल प्रॉडक्टबद्दल फक्त ९% भारतीयांना माहिती आहेत.
- भारतीय शेअरबाजार हा जगातील जुन्या शेअरबाजारा पैकी एक असुनही फक्त 6% लोकच शेअरबाजारात गुंतवणुक करतात. गेल्या 40 वर्षात तब्बल १५.६८% इतका परतावा सातत्याने देवुनही बहुतांश भारतीय लोक याला सट्टा किंवा जुगार मानतात. भारतातील लोकांपेक्षा परदेशी गुंतवणुकदार येथे जास्त प्रमाणात गुंतवणुक करताना आढळतात. शेअरबाजारात गुंतवणुक ही संस्कृती रुजवण्यात सरकार व नियंत्रक सेबी अपयशी ठरले आहेत अस मत आहे.
*आर्थिक साक्षर व्हा*
माहिती व मार्गदर्शन
गुंतवणूक व असेट अलोकेशन एकत्रित प्लॅटफॉर्म साठी लिंक :

