म्युच्युअल फंड बद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल कि अनेक लोकाना शेअर बाजारात गुंतवणूक करावीशी वाटते. त्यांचेकडे पैसेही असतात मात्र त्यांना शेअर बाजाराचे ज्ञान पुरेशा प्रमाणात नसते.
अशांसाठी आपल्या देशात प्रथमतः सरकारच्या सहभागाने युनिट ट्रस्ट इंडिया या असेट मॅनेजमेंट कंपनीची (AMC) स्थापना सन १९६४ मधे करण्यात आली.
आपल्यापैकी पुष्कळ 50+ वयाच्या गुंतवणूकदारांनी मास्टर शेअर, मास्टर प्लस बाबत ऐकले असेल. युनिट ट्रस्ट (Unit Trust of India). हीच ती भारतातील पहिली म्युच्युअल फंड कंपनी.
१९८६ मधे सर्वजनीक बॅंकाना म्युच्युअल फंड स्थापण्याची परवानगी देण्यात आली.
१९९३ पासून खाजगी म्युच्युअल फंडाना परवानगी मिळाली. सध्या देशात 44 हून जास्त म्युच्युअल फंड कंपन्या कार्यरत आहेत.
पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणुक करता तेव्हा तुम्ही एकटे नसता. आपले पैसे बँकांतील ठेवी पेक्षा जास्त दराने कायदेशीर रित्या वाढावेत आणि ते तज्ञानी आपल्या वतीने करुन द्यावे असा तुमच्यासारखा विचार करणारे इतर अनेक गुंतवणूकदार तुमच्या सोबत असतात.
तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणुक केली की तुमच्यासारखेच ध्येय असणा-या गुंतवणूकदारांचे पैशासोबत तुमचे पैसे एकत्र केले जातात. तुम्ही केलेल्या गुंतवणूकीच्या बदल्यात तुम्हाला युनिटस दिली जातात.
(तुम्ही केलेली गुंतवणूक रुपये / त्या दिवशीचे गुंतवणूक मुल्य म्हणजेच NAV = तुम्हाला अदा केलेली युनिटस्)
मग हे पैसे म्युच्युअल फंड कंपनीचा फंड मॅनेजर शेअर्स। डिबेंचर्स ते मनी मार्केट पर्यंतच्या वेगवेगळ्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवतात. त्याला कॉर्पस (corpus) या नावानेही ओळखले जाते. रोजच्या रोज सायंकाळी गुंतवणूकीचे मुल्यांकन केले जाते आणि प्रत्येक युनिटचे निव्वळ मालमत्ता मुल्य Net Asset Value (NAV) जाहीर केली जाते. अशाप्रकारे म्युच्युअल फंड तुम्हाला तुलनात्मकदॄष्ट्या कमी खर्चात विविध व्यावसायिक व्यवस्थापन (Professionally Manage) केलेल्या फंड्मध्ये गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करुन देतो
अशाच माहिती साठी फेसबुक पेज ला भेट द्या
अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी.
WhatsApp - 9130993995
No comments:
Post a Comment