Wednesday, January 6, 2021

सावध हरिणी सावध गं .. गुंतवणूक सल्लागार अपॉइंटमेंट द्या म्हणून मागे लागलाय... नक्की वाचा... अर्थ साक्षर व्हा.

नवीन वर्ष सुरू झाले. आपण आनंदात असतो तेवढयात फोन वाजतो. 

1. पलीकडून एक सुरेल गोड आवाजात मुलगी बोलत असते. अनेक गुंतवणुकीच्या योजना सांगून भुरळ पाडत असते. 
2. गुंतवणुकीसाठी आपल्या ओळखीचा, मित्राचा मित्र जवळची व्यक्ती किंवा आपल्या बॉस किंवा  ज्यांना आपण मानतो अशा व्यक्तींचा रेफरन्स देवून आपली अपॉईंटमेंट मागतो.

सावध व्हा..

गुंतवणूक (Investment) आणि विमा (Insurance) फरक जाणून घ्या 

विमा व गुंतवणूक यांची गल्लत करु नका.
१. विमा हे गुंतवणूकीचे साधन केव्हाही होत नाही.
२. विमा कंपन्यांचे पेंशन प्लान घेण्याऐवजी कोणत्याही गुंतवणूक साधनात गुंतवणूक नियमीतपणे करत रहा व निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम चांगल्या साधनात गुंतवून उर्वरीत आयुष्य सुखासमाधानात घालवा.
३. विमा हा तुमची गरज म्हणूनच घ्या, तुमचा मित्र, नातेवाईक, परिचीत विमा एजंट झालेला आहे, त्याला कसे दुखवायचं म्हणून अजिबात घेऊ नका, त्याला अन्य प्रकारे मदत करा पण त्याच्याकडून कोणतीही विमा पॉलीसी घेऊन फसू नका.
४. विमा एजंट पिच्छा पुरवतअसतात व प्रभावी व्यक्तींना रेफरंस मागत असतात. त्यामुळे बऱ्याच वेळा अशा व्यक्ती ब्याद टाळण्यासाठी नंबर देतात, त्यात तुमचा नंबर असू शकतो.

विमा का घ्यावा व त्याची गरज

माणसाच्या जिवनात अनेक घटना अनिश्र्चितपणे घडतात. त्या कधी घडतील हे कोणीच सांगू शकत नाही. मात्र जर का आपण योग्य वयात, शक्यतो आपला प्रमुख उत्पन्नाचा स्त्रोत सुरु झाल्यावर लगेचच खालील प्रकाचे विमा संरक्षण घेतले तर त्या वेळेला वय कमी असल्यामुळे विम्याचा हप्ता कमी पडतो व उर्वरीत रक्कम आपल्या जोखीम स्विकारण्याच्या तयारी नुसार योग्य त्या गुंतवणूक साधनात नियमीतपणे (शक्यतो दर महा) दिर्घ काळासाठी गुंतवावी म्हणजे जिवनातील कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाणे सुलभ होईल.
विमा प्रत्येकानेच खालील प्रमाणे घ्यावा:

१)      जिवन विमा: हा टर्म इंशुरन्सचे माध्यमातूनच घ्यावा. ज्याना शक्य आहे त्यानी तो ऑनलाईनच खरेदी करावा ज्यामुळे सर्वात कमी हप्ता भरावा लागतो, कारण यात एजंट नसल्यामुळे त्याच्या कमिशनचा खर्च वाचतो. विमा हा आपल्या वार्षीक उत्पन्नाच्या किमान १० पट घ्यावा. इंशुरन्स कंपनीकडून जेवढे जास्तीत जास्त विमा संरक्षण मिळू शकत असेल तेवढे घ्यावे. विम्याची मुदत जास्तीत जास्त घ्यावी (किमान ३० वर्षे तरी असावी). ३० वर्षाचे व्यक्तीला वार्षीक सरासरी रु.६०००/- हप्ता भरुन रु.५० लाखाचे विमा संरक्षण प्राप्त होते (ऑनलाईन).

२)      मेडिक्लेम: प्रत्येकाने हेल्थ इंशुरन्स घेणे अत्यावश्यकच आहे कारण कोणत्या प्रकारचा आजार कधी उद्भवेल हे सांगता येत नाही. साधारणपणे किमान रु.५ ते १० लाखाचे संरक्षण प्रत्येक व्यक्तीचे असावे. यासाठी अल्पदरात योजना आहेत ( यासााठी रु.१० लाखापर्यंतचे उपचार मिळू शकतात. तसेच टर्म इंशुरन्स घेतानाच यासाठी स्वतंत्र रायडरव्दारे असा विमा थोडा अधिक हप्ता भरुन मिळू शकतो.

३)  अपघात विमा: अपघात काही सांगून होत नाही म्हणून प्रत्येकाने हा अवश्य घ्यावा, अत्यंत कमी हप्ता भरुन अशा प्रकारचा विमा मिळतो.

४)  कर्जफेडीचा विमा: जेव्हा आपण गृह कर्ज, वाहन कर्ज घेतो तेव्हा मुदतीपुर्वी कर्जदाराचा मृत्यु झाल्यास वारसाना उर्वरीत कर्जाचे हप्ते न भरता त्या मालमत्तेचा ताबा निर्वेधपणे मिळण्यासाठी या प्रकारचा विमा अवश्य घ्यावा. यासाठी कर्ज घेतानाच बँकेतच याबाबत चौकशी करावी. तसेच बँक शक्यतो अशा प्रकारे विमा स्वतः करते.

५)  कायमस्वरुपी अपंगत्व विमा: कोणत्याही कारणाने शारीरीक अपंगत्व आल्यास असा विमा उपयुक्त होतो. टर्म इंशुरन्स घेतानाच यासाठी स्वतंत्र रायडरव्दारे असा विमा थोडा अधिक हप्ता भरुन मिळू शकतो.

६)   भविष्यातील विमा हप्ते माफ होण्याची सुविधा: टर्म इंशुरन्स घेतानाच यासाठी स्वतंत्र रायडरव्दारे असा विमा थोडा अधिक हप्ता भरुन मिळू शकतो ज्यामुळे कायम स्वरुपी अपंगत्व आल्यास पुढील हप्ते न भरताही जिवन विमा संरक्षण पुढे चालू राहते.

७)  ट्रँव्हल इंशुरन्स: कोणत्याही सहलीला जाताना या प्रकारे विमा संरक्षण मिळू शकते.

८)   उत्पन्न रायडर: जिवन विम्यासोबत मिळू शकते, विमा धारकाचा मृत्यु झाल्यास वारसाला उर्वरीत मुदतीचे काळात विमा संरक्षणाचे १०% एवढी रक्कम दर वर्षी मिळत रहाते.

९)   वाहन विमा: हा प्रत्येक वाहन मालकाला घेणे बंधनकारकच आहे.

१०)  मालमत्ता विमा: जसे कि घराचा विमा घेतल्यास दुर्दैवाने घराला कोणत्याही कारणाने धोका निर्माण झाल्यास झालेले नुकसान भरुन मिळते, ज्यामुळे नविन घर बांधणे सुलभ होते.

११)   चोरीचा विमा: चोरीपासून झालेले नुकसान भरुन मिळते.

१२) फायर, फ्लड इ. विमा: आग, पूर इ. कारणामुळे झालेले नुकसान भरुन मिळते.

विमा घेताना काय काळजी घ्याल?
आजकाल अनेक विमा कंपन्या बाजारात कार्यरत आहेत म्हणून कोणत्याही प्रकारचे विमा संरक्षण घेताना उपलब्ध सारे पर्याय तपासून पहा.
१)  ज्या कंपनीचा सर्वात कमी हप्ता असेल त्या कंपनीची विमा योजना निवडा.
२)  विमा घेताना सर्व अटी समजून मगच विमा घ्या म्हणजे नंतर पस्तावण्याची वेळ येणार नाही.
३)   क्लेमबाबत पुर्ण माहिती घ्या.
४)   कोणकोणत्या बाबींसाठी क्लेम मिळणार आहे व कोणत्या कारणांमुळे तो मिळणार नाही हे चेक देण्यापुर्वीच तपासून पहा.
५)  जिवन विमा घेताना फक्त टर्म इंशुरन्सचे माध्यमातूनच घ्या कारण जिवन विम्याचा हा सर्वाधिक स्वस्त पर्याय आहे.
६)   विमा व गुंतवणूक यांची गल्लत करु नका.
७)   विमा हे गुंतवणूकीचे साधन केव्हाही होत नाही.
८) विमा कंपन्यांचे पेंशन प्लान घेण्याऐवजी कोणत्याही गुंतवणूक साधनात गुंतवणूक नियमीतपणे करत रहा व निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम चांगल्या साधनात गुंतवून उर्वरीत आयुष्य सुखासमाधानात घालवा.
९)  विमा हा तुमची गरज म्हणूनच घ्या, तुमचा मित्र, नातेवाईक, परिचीत विमा एजंट झालेला आहे म्हणून अजिबात घेऊ नका, त्याला अन्य प्रकारे मदत करा पण त्याच्याकडून कोणतीही विमा पॉलीसी घेऊन फसू नका.
१०) विमा एजंटमार्फत घेत असताना तो एजंट कायम स्वरुपी तुम्हाला सेवा देऊ शकेल याची खात्री करुन घ्या, शक्यतोवर तो हा व्यवसाय प्रामाणिकपणे व कायमस्वरुपी करणारा असावा.
११) कोणत्याही परिस्थितीत युलीपचा प्लान (ULIP V/s Mutual Fund) न घेणे हाच शहाणपणा आहे. याला उत्तम पर्याय म्हणजे दिर्घ मुदतीसाठी टर्म इंशुरन्स व म्युच्युअल फंडाचे कॉम्बीनेशन करा, तुमचा फायदाच होईल.
१२)  आपल्या बचतीपैकी थोडी तरी रक्कम अवश्य म्युच्युअल फंडाचे एखाद्या चांगल्या समभाग योजनेत नियमीत दर महा जास्तीत जास्त काळासाठी गुंतवा, यातूनच संपत्ती निर्माण होईल, जी भविष्यातील तुमच्या अनेक गरजा पुर्ण करण्यास मदत करेल

जीवन विमा पॉलीसी किती रकमेची विकत घ्यावी ?

स्वतःसाठी जेव्हा तुम्हाला जीवन विमा संरक्षण पॉलीसी घेण्याची वेळ येईल तेव्हा प्रथम तुम्हाला किती जीवन विमा संरक्षण हवे आहे ते निश्चित करा त्यानंतर सर्वात कमी खर्चिक ‘टर्म प्लान’ निवडा जो तुमची गरज भागवू शकेल......
तुम्हाला किती विमा रकमेची गरज आहे हा प्रश्न पडतो तेव्हा लोक फारसा विचार न करता काहीतरी एखादी रक्कम सांगतात आणि मला एव्हडे विमा संरक्षण पुरेसे होईल असे म्हणतात. 
यापेक्षा भयावह गोष्ट म्हणजे बरीच सर्व सामान्य माणसे त्यांच्या विमा एजंटलाच सांगतात कि मी कोणती पॉलीसी घेऊ व किती रकमेचा विमा घेऊ ते तूच ठरव. तुमचे जीवन विमा संरक्षण ठरवणे हा एक महत्वाचा निर्णय घेण्याची हि अत्यंत चुकीची पद्धत आहे.
खर म्हणजे यासाठी तुम्ही प्रथम तुमच्या भावना बाजूला ठेऊन तुमचे विम्याचे नियोजन काळजीपूर्वक जर तुमचे अकाली निधन झाले तर तुमच्यावर अवलंबून पाठी रहाणा सर्व वर्षांची भविष्यातील सर्व आर्थिक गरजा ज्या रकमेतून दीर्घ काळ किंवा तुमच्या वारसाचा कायम उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होईपर्यंत सर्व आर्थिक गरजा भागवू शकेल एवढ्या रकमेचे जीवन विमा संरक्षण तुमच्यासाठी आवश्यक असते. हे करताना जर आपल्या मुलाचे दोन्ही पालक (आई व वडील) एकाच वेळी अपघातात मृत्यू पावले तर त्या लहानग्यांची काळजी ते उत्तम शिक्षण घेऊन सज्ञान होऊन चांगली नोकरी अथवा धंदा करून पुरेसे उत्पन्न मिळवू लागेपर्यंत त्या पैशातून येणारे व्याजातून त्यांचे सर्व खर्च भागू शकतील एवढी ताकद मिळणाऱ्या विमा संरक्षण रकमेत असली पाहिजे. दोघाचा एकत्र मृत्यू येण्याची शक्यता जरी कमी असली तरी अश्या अनेक या पूर्वी झालेल्या घटना तुम्ही पाहिलेल्या असू शकतात आणि म्हणूनच हि शक्यता विमा घेताना गृहीत धरणे अत्यावशक आहे.  आणि अशी अपवादात्मक घटना फारच गंभीर असते. विमा घेताना ज्या बाबी विचारात घेतल्या पाहिजेत त्या काही खाली देण्याचा प्रयत्न करत आहे.

निवृत्त होण्यासाठी किती कालावधी बाकी आहे:  
तुम्ही तुमची टर्म इन्शुरन्स प्लानच्या विम्याची रक्कम ठरवण्यापूर्वी तुम्हाला निवृत्त होण्यासाठी काळ उरला आहे हे विचारात घेतलेच पाहिजे तसेच महागाईचा दर विचारात घेऊन अचानक मृत्यु झाल्यास किती रक्कम वारसाला मिळाली पाहिजे हेही ठरवणे आवश्यक आहे. निवृत्तीचा कालावधी विचारात घेताना फक्त आपल्या नोकरी किंवा व्यवसायातून निवृत्ती घेण्यासाठी किती वर्षे उरली आहेत एव्हढेच विचारात घ्यायचे नाही तर किती कालापार्यात तुमच्यावर अवलंबून असणारी माणसे किती वर्षे तुमच्यावर अवलंबून असणार असतील हेही विचारत घेतले पाहिजे. एकदा का तुम्हाला समजले कि किती वर्षे त्यांना तुमच्या कडून आर्थिक साह्याची गरज आहे कि तुम्हाला तुमची विम्याची रक्कम व विम्याची मुदत किती असावी हे ठरवणे सोपे जाईल. उदा. जर का तुम्ही वरील हिशोबाने अजून ३० वर्षाने निवृत्त होणार असाल तर तुमच्या विम्याची मुदत किमान ३० वर्षे असावयास हवी. थोडक्यात जोपर्यंत तुमच्या घरातील एखादी व्यक्ती तुमची आर्थिक जबाबदारीची जागा घेऊ शकण्यास सक्षम होण्यासाठी जितकी वर्षे बाकी असतील तेव्हड्या वर्षासाठी तुम्ही insured असले पाहिजेत.
कर्जे आणि दाइत्वे: ज्यावेळी तुम्ही कोणत्याही प्रकारची कर्जे घेता तेव्हाच त्या कर्जाच्या परतफेडीची काळजी घेणारा संबधित insurance अवश्य घ्या जेणे करून तुमचा अकाली मृत्यू झाल्यास ते कर्ज परस्पर विमा रकमेतून फेडले जाईल. जर तुम्ही होम लोन घेतले असेल तर संबधित बँक किंवा संस्था तुमचा होम इन्शुरन्स घेतच असते पण जर तो तसा घेतला गेला नसेल तर तुम्ही तो घ्या. अन्य कर्जे सुधा याच प्रकारे सुरक्षित करा. हि कर्जे तुम्ही तुमचा टर्म इन्शुरन्स प्लान मध्ये सुद्धा समाविष्ट करून घेऊ शकता मात्र हे करताना विमा कंपनी परस्पर कर्ज देणाऱ्या संस्थेला उर्वरित कर्जाची रक्कम देईल अशी व्यवस्था करून घ्यावी जेणे करून वारसांना कर्ज पुढे चालू ठेवण्याचा मोह होणार नाही. हे करताना तुम्ही जर काही असुरक्षित कर्जे जशी कि क्रेडीट कार्ड वगैरेची घेतलेली असतील तर त्यांची सोय या विम्यात करण्याची गरज नाही कारण ज्यांनी credit card (क्रेडीट कार्ड) दिले आहे ते तुमच्या वारसा कडून त्याची देय रक्कम कायदेशीर दृष्ट्या वसूल करू शकत नाहीत. याच प्रमाणे जर तुम्ही एखादी गाडी कर्ज घेऊन घेतली आहे तर त्याचीही विमा रकमेत समावेश करण्याची गरज नाही जर तुम्हाला असे वाटत असेल कि तुमच्या पश्चात तुमचे वारस तसेही ते वाहन वापरण्यास सक्षम नाहीत. याचे उदिष्ट विमा हप्ता कमीत कमी ठेवणे हा असला पाहिजे.

महागाईचा दर:  दर वर्षी सरासरी ७% दराने महागाई वाढत असते हे विचारात घेणे अत्यावश्यक आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या विम्याची रक्कम ठरवणे सोपे जाईल.

शिक्षण: तुमच्या मुलांचे शिक्षण कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होण्याची आवशकता असते यासाठी काही टर्म इन्शुरन्स योजना असतात त्यातील एकाची अवश्य निवड करावी पण ती अशी नसावी कि जर तुम्ही हयाद असाल तर तुम्हाला त्यातून पैसे मिळतील (कारण उगाच जास्त हप्ता बसेल), हि पोलिसी घेतानाच सोबत एखादी म्युचुअल फंडाची योजना अशी ग्यावी कि ज्यातून तुमच्या मुलाच्या शिक्षण पूर्ण होण्या इतकी रक्कम तुम्हाला मिळेल.

भविष्यातील खर्च: जर तुम्ही या जगात राहिला नाहीत तर दर महिना किती रक्कम तुमच्या वारसाला मिळाली पाहिजे हे, सोबत महागाईचा दर विचारात घेऊन ठरवा व ती रक्कम जर सुरक्षित साधनात गुंतवली तर कमीत कमी किती व्याज त्यावर मिळेल हेही विचारात घ्या. हे ठरवताना भविष्यात व्याजाचे दर कमी होऊ सतील हेही विचारात घ्या. जर तुमची पत्नी सध्या नोकरी किंवा व्यवसाय करत नसेल तर कदाचित तुमच्या पश्यात तिला ते करावे लागेल तर त्यासाटी काही गुंतवणुकीचीही रक्कम विचारात घ्या.
 
जीवन विम्याची रक्कम किती असावी याचे काही सामान्य नियम आहेत जसे कि जेव्हढे तुमचे वार्षिक उत्पन्न असते त्याच्या किमान १० ते १२ पट तुमचा विमा असावा पण हा नियम तुम्हाला लागू होईलच असे नाही कारण वर सांगितलेल्या बाबी विचारात घेतल्यानंत कदाचित यापेक्षा जास्त अथवा कमी रकमेच्या विम्याची तुमची गरज असू शकेल व ती अन्य कोणापेक्षाही तुम्ही स्वत:च जास्त चागली जाणू शकता.
विम्याची रक्कम हि काही बाबींवर अवलंबून असते त्या म्हणजे तुमची सध्याची जीवनशैली, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, वार्षिक खर्च, सध्या तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचे बाजारमूल्य, तुमची कर्जे – होम लोन शैक्षणीक कर्जे व शिक्षण वर होणारा भविष्यातील खर्च. ह्या सर्व गोष्टी विचारात घेतल्यानंतर जी संख्या येते ती तुमची ‘लाइफ व्हॅल्यू’ मानली जाते. बहुतांशी विमा काम्न्या ‘लाइफ व्हॅल्यू कॅलक्यलेटर’ त्याच्या वेब साईट वर देत असतात त्याचा जरूर वापर करावा.  मात्र हे विसरू नका कि आजच्या रुपयाची खरेदी क्षमता नेहमीच कमी होत असते.
आपले जीवन विमा संरक्षण निशित किती असावे हे ठरवणे अत्यंत महत्वाचे असते कारण जर ते गरजेपेक्षा जास्त घेतले तर उगाच जास्त हप्ता भरावा लागेल व तेव्हढी गुंतवणुकीची क्षमता कमी होईल व भविष्यात मिळणाऱ्या फायद्याला मुकावे लागेल व जर ते कमी असेल तर मिळणाऱ्या विमा संरक्षणातून कुटुंबाची गरज भागू शकणार नाही. बहुतांशी विमा उत्पादनात कमीत कमी व जास्तीत जास्त किती विमा संरक्षण मिळेल याचा उल्लेख असतो ते तपासून पाहणे अत्यावश्यक असते.
त्याच प्रमाणे कोणत्या विमा कंपनीचा टर्म इन्शुरन्स चा किती रकमेला किती हप्ता आहे हेही नीट तपासून पाहावे यामुळे कोणाचा हप्ता कमी आहे हे समजेल. तसेच त्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो काय आहे हेही तपासा. काही योजना जास्त रकमेच्या विम्यावर डिस्काऊट देत असतात तेही पहा. मात्र काही वेळा हा डिस्काऊट जाहिरातीसाठी केलेली फसवी क्लुप्तीही असू शकते हे लक्षात ठेवा. हेच तर भावना बाजूला ठेवून अत्यंत काळजीपूर्वक व वास्तवावर आधारित केलेले विमा नियोजन असू शकते.  याच प्रमाणे आपले इच्छापत्र किंवा मृत्यू पत्र करणे हेही महत्वाचे असते हे लक्षात ठेवा. भारतात अनेक नावाजलेल्या उद्योगपतीनीही हे वेळीच न केल्यामुळे त्यांचे वारसांना कोर्टात भांडणे करावी लागलेली आहेत.

विचार करा.. व निर्णय घ्या.. 

For All kinds of Investments and Mutual Funds

Open E-WEALTH Account

Financial Planning Service

Plan your financial goals with a robust portfolio which creates quality wealth over long term.

Largest Mutual Fund and Investment Platform


No comments:

Post a Comment